सोलापूर - प्रबुद्ध भारत चौक, मिलिंद नगर, बुधवार पेठ, सोलापूर. या ठिकाणी सायंकाळी 5 : 00 वाजता. 10 जून रोजी पुणे येथील बालेवाडी येथे होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरातील भीमसैनिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रथमतः विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी 10 जून रोजी बालेवाडी येथे होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहा अशा सूचना दिल्या.
या नियोजन बैठकीवेळी गणेश पुजारी, भारत (मालक) बाबरे, सुखदेव इंगळे, गौतम इंगळे, गौतम (महाराज) चंदनशिवे, अविनाश भडकुंबे, चंद्रकांत सोनवणे, श्रीमंत (आप्पा) जाधव, आदित्य चंदनशिवे, धम्मपाल मैंदर्गीकर, बापू शिंदे, प्रा. अविनाश शिंदे, धीरज वाघमोडे, नितीन बंदपट्टे, अरविंद गायकवाड, सुनील गायकवाड, अण्णा वाघमारे, बाबा गायकवाड, रवी काकडे, मनोज थोरात, राम सर्वगोड, अनिस सय्यद, अमोल बनसोडे, गौतम नागटिळक, गौतम शिंदे, सिद्धांत तळभंडारे, बाळराज जाधव, विशाल मैंदर्गीकर, अक्षय मस्के, अजय इंगळे, आशिष पात्रे, अनिल अलदर, निशांत जाधव, बंटी सरवदे, विनय क्षिरसागर, शैलेश बनसोडे, लखन चंदनशिवे, संतोष चंदनशिवे, सुभाष स्वा, अमर सोनकांबळे, लोकेश लालबेगी, राजाराम लोखंडे, प्रदीप गवळी, श्रीकांत वाघमोडे, श्रीपती गायकवाड, सुरज वाघमोडे, रवी म्यातोरोलू, मुन्ना केशपागा, बाबा संदोल्लू, विक्रम घेचंद, विकी माळाळे, भोला माळाळे, सतीश घेचंद, गौतम खरे, मनीष साळवे, गौतम शिंदे, जयराज सांगे, आदित्य साबळे, निखिल शिंदे, रोहन तळभंडारे तसेच सोलापूर शहरातील भीमसैनिक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment