सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा (अजित पवार गट) २६ वा वर्धापन दिन सोहळा मंगळवारी १० जून रोजी पुणे येथील श्री छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे या सोहळ्यासाठी सोलापूर शहरातील विविध भागातील शेकडो राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांसह इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे पदाधिकारी आणि मित्रपरिवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातून पुण्याकडे रवाना झाले. प्रारंभी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्याला जाणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी वाहन, चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती विशेषतः महिला भगिनी मोठ्या संख्येने आजच्या सोहळ्यासाठी सहभागी झाले होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्यासह आमदार,खासदार, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी हे या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अव्वल स्थानी राहील.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये सोलापूरकरांनी राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहावे नक्कीच बारामतीच्या धर्तीवर सोलापूरचा विकास अजित पवारांच्या माध्यमातून होईल अशी आशा देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी व्यक्त केला. दरम्यान यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो अजित पवार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.. एकच वादा अजित दादा.. अशा जोरदार घोषणा दिल्या.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रुक्मिणी जाधव शहर सचिव लक्ष्मी पवार सुनिता बिराजदार, शहर मध्य विधानसभा सचिव मीना जाधव, विधानसभा अध्यक्ष शोभा गायकवाड,सहचिटणीस प्रमिला स्वामी, सरचिटणीस संगीता गायकवाड, आईशा नदाफ, पूजा कुंशिकर, निर्मला नदाफ खात गुण नदाफ, रजनी मेत्रे,सोनी वर्जन, सावित्री मल्ला मोरे, ललिता ननवरे रत्नाबाई पुजारी वंश राज पवार अवधूत जाधव, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष किरण शिंदे, शहर सचिव अमोल जगताप ,सोशल मीडिया प्रमुख ऋषी येवले, शहर उपाध्यक्ष रोहन भडंगे, संघटना सचिव प्रथमेश पवार, सागर कांबळे, हुलगप्पा शासम, वसंत कांबळे,माऊली जरग, सचिन पिसे, सचिन अंगडीकर, संतोष लोढे, उमेश जाधव, संतोष गायकवाड, जयेश जाधव, हरीश तेलगू,अमोल लकडे, संतोष गायकवाड, हुडको सुहास जाधव सर, स्वप्नील जाधव, मच्छिंद्रनाथ गायकवाड, केतन निकम सोनू गायकवाड तेजस गायकवाड उत्कर्ष गायकवाड यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment