सोलापूर - दक्षिण आफ्रिकेतील डर्बन शहरात जगप्रसिद्ध, अत्यंत कठीण असे चढ उतार असलेली ९० किलो मीटर ची "अल्टिमेट ह्युमन रेस" म्हणजेच काॅम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन सोलापूर च्या "वाघचवरे भावंडांनी" निर्धारित वेळे आधीच पुर्ण करुन एक प्रकारे इतिहास रचला आहे. ही स्पर्धारविवार आठ जुन २०२५ रोजी पार पडली.
तिघा भारतीय बहिण - भावांनी असे करण्याची हि पहिलीच वेळ आहे. संपूर्ण जगातुन २५००० स्पर्धकांनी या वर्षीच्या ९८ व्या काॅम्रेड मॅरेथॉन मध्ये सहभाग नोंदविला होता. तर भारतातून ४३० स्पर्धक पात्र ठरले होते.या स्पर्धेला वेळेचे बंधन होते. पहिल्या पाच टाईम कट ऑफ व्यतिरिक्त बारा तासांच्या निर्धारित शेवटच्या कट ऑफ च्या आत हि ९० कि. मी स्पर्धा पुर्ण करण्याची अट असते.
पीटरमॅरीट्स्बर्ग ते डर्बन अशा ९० कि मी च्या पर्वत रांगांतुन पहाटेची कडाक्याची थंडी, दुपारचे ऊन तर सायंकाळी चार नंतर समुद्राकडून अंगावर शहारे येणारे गार वारे अशा प्रतिकुल वातावरणात ९८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच तिघा भारतीय भावंडांनी एकत्रित हि मॅरेथॉन यशस्वी रित्या दिलेल्या निर्धारित वेळेपेक्षा आधीच फिनीश केली.
या मध्ये डॉ. स्मिता राहुल झांजुर्णे ( वाघचवरे ) यांनी ब्राॅंझ मेडल पटकावीले, तर डॉ.सत्यजित सत्यवान वाघचवरे, व हि मॅरेथॉन "दुसर्यांदा पुर्ण" करित असलेले, डॉ.अभिजीत सत्यवान वाघचवरे या बंधुंनी मानाचे असे "व्हीक क्लाफाम" मेडल कमावुन इतिहास रचला. या संपूर्ण मॅरेथॉन च्या प्रवासामध्ये त्यांना कुटुंबातील सर्व सदस्यांची मोलाची साथ लाभली.
मॅरेथॉन रुट वरिल ४५ व्या कि. मी (हाफ वे ) ला त्यांचे आई-वडील, मॅरेथॉन रनर असलेल्या त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ.शुभांगी , डॉ.राजश्री व मुले हे सर्व प्रत्यक्ष तासंतास ऊभे राहून त्यांना खाण्या- पिण्याचे साहित्य पुरवित होते व त्यांचे मनोबल वाढवित होते. अवघड लांब पल्ल्याच्या "अल्ट्रा मॅरेथॉन" स्पर्धेत अशा बाबींची अत्यंत गरज असते. डॉ . सत्यजित व डॉ . अभिजीत यांना "काॅम्रेड मॅरेथॉन" चे कोचींग मुंबई चे सुप्रसिद्ध कोच साठ वर्षीय सतिश गुजारन ज्यांनी हि मॅरेथॉन या वर्षी सहित सलग चौदा वर्षे पुर्ण केली आहे यांचे लाभले.
"वर्ष भराचे कठीण ट्रेनिंग, संतुलीत आहार, पुरेशी झोप , हाॅस्पिटल च्या कामाचा व्याप या सर्वांची सांगड घालत सोलापूरकरांच्या शुभेच्छा व देवाचे आशिर्वाद याच मुळे हि काम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत यश मिळविता आले". असे सोलापूर चे पहिले आयर्न मॅन डॉ.अभिजीत वाघचवरे यांनी नमूद केले.
डॉ. वाघचवरे भावंडांनी "काॅम्रेड मॅरेथॉन" स्पर्धेत मिळालेले हे यश, "पहलगाम" हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना "समर्पित" करत देशाप्रती आपली भावना व्यक्त केली. व डर्बन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भारताचा तिरंगा फडकवित, "ऑपरेशन सींदूर" च्या प्रती अभिमान दर्शविणारा फलक झळकवीत अनेक दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
No comments:
Post a Comment