सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच सोलापूर येथे रिंगरोड व आयटी पार्क मंजूर करावेत. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासह विविध मागणीचे निवेदन शिवसेनेचे(शिंदे गट) जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अक्कलकोट येथे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या शिवसेना प्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री शिंदे आले असता यावेळी त्यांना भेटून जिल्हाप्रमुख पाटील यांनी हे निवेदन दिले आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख पाटील यांनी निवेदनात दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सुटण्यासाठी वडापूर बॅरेजसची निविदा काढावी, सीना- भीमा जोड कलव्याला मंजुरी द्यावी. आणि त्याचं काम सुरुवात करावी हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यास दक्षिण सोलापुरात हरित क्रांती होणार आहे. दक्षिण सोलापुरात बेरोजगारी वाढली असून यासाठी मंद्रूप येथे एमआयडीसी मंजूर करावेत अशी मागणी केली आहे.
तालुक्यात वाढते अपघात वाढले आहेत. यासाठी तसेच विविध रुग्णांच्या सोयीसाठी मंद्रूपमध्ये उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावेत.भंडारकवठे येथे पूराचे पाणी गावात येत असल्याने येथील पूर संरक्षण बंधार-यांची दुरुस्ती करून उंची वाढवावेत. शिरवळ येथील धुबधुबी प्रकल्पात दरवर्षी पाणी सोडले जात नाही त्यामुळे परिसरातील पंधरा-वीस गावांना पाणीटंचाई भेडसावते यासाठी धुबधुबी प्रकल्पात उजनी धरणातून पाणी सोडण्यासाठी पाणी आरक्षित करण्यात यावेत.आणि दरवर्षी पाणी सोडावेत.टाकळी येथे ब्रीज कम् बंधारा मंजूर करण्यात यावेत.शेतकऱ्यांना नदीकाठी सोळा तास वीजपुरवठा करावेत.
मंद्रूप अपर तहसील कार्यालय येथील रिक्त पदे भरण्यात यावेत, तालुक्यातील रस्त्यासाठी निधी उपलब्ध करावा.जुळे सोलापूरात आयटी पार्क मंजूर करावेत तसेच कलावंतांसाठी नाट्यगृह मंजूर करावेत.सोलापूर -मुंबई तात्काळ विमानसेवा सुरू करावी.कंबर तलाव सुशोभीकरण करावेत. सोलापुरात वाहतुकीची कोंडी वाढत असून यासाठी शहराच्या बाहेरून रिंग रोड मंजूर करावेत.जुळे सोलापूर भागातील वीज रस्ते पाणी आरोग्य व अन्य सुविधांसाठी नगरविकास खात्यातून भरीव निधी मंजूर करावेत.
लिंगायत भवनासाठी एक कोटी रुपये मंजूर करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.यावेळी धर्मराज बगले,निंगराज हुळ्ळे, योगीराज पाटील, संतोष बरूरे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment