लेदर बॉल लीग क्रिकेट स्पर्धेत अटीतटीच्या सामन्यात HPCCAC विजयी - swarajyanewsmarathi

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, 7 June 2025

लेदर बॉल लीग क्रिकेट स्पर्धेत अटीतटीच्या सामन्यात HPCCAC विजयी

 



सोलापुर - दयानंद कॅलेज मैदान येथे दत्तू नागप्पा बंडपट्टे अंडर १२ लेदर बॉल लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दि. ७ जून रोजी खेळल्या गलेल्या अटीतटीच्या क्रिकेट सामन्यात HPCCAC 12 वर्षाखालील संघाने सेमी फाईनलमध्ये प्रवेश केला. साखळी सामन्यात दोन विकेट्स ने सामना जिंकला.






प्रथम फलंदाजी करताना United AC सर्वबाद 126/10 धावा 23.3 ओव्हर मध्ये केले. शौर्य साठे ने 57, अभय अझलापुरे 16 व पुषकर पवार 14 धावा केल्या. HPCCAC कडून दर्शन काळे याने   गोलंदाजीत 14 धावा देत ३ गडी बाद केले. हर्ष जगताप याने २ गडी बाद केले तर २ क्षेत्ररक्षणामध्ये गडी बाद केले. अदित्या चटके याने 1 गडी बाद केला.







HPCCA संघाने 27.4 ओव्हर मध्ये 130  धावा करून HP CCAC सामना जिंकला तन्मय वाघमोडे 44, हर्ष जगताप 15, कैप्टन अदित्य चटके 18 धावा, नयनिश गरमपल्ली 15 धावा देत 2 गडी बाद केले. स्वारीत शहा 24 धावा देत 2 गडी व सम्राट, शौर्य, वरद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. अदित्या चटके संघाला तीन बॉल दोन धावांची गरज असता चौकार मारून त्यांनी विजय मिळवून दिला.






सामनावीर हर्ष जगताप, उत्कृष्ट फलंदाज शौर्य साठे, गोलंदाज दर्शन काळे हे खेळाडू ठरले. विजय संघाचे मार्गदर्शन मुख्य कोच  अनिल साम्राणी व सुरेश जगताप यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक प्रा. नारायण बनसोडे उपस्थित होते.


 




यांनी केली उत्कृष्ट कामगिरी

12 वर्षाखालील वयोगटातील क्रिकेट सामन्यात हर्ष जगताप, तन्मय वाघमोडे, शैर्य साठे, अदित्य चटके, दर्शन काळे, नयनिश गरमपल्ली

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here