सोलापूर - प्रभाग क्रमांक 26 मधील प्रियांका नगर ते विश्व सोसायटी दरम्यान गेल्या 25 ते 30 वर्षापासून तेथे कुठल्याच सुविधा नव्हत्या त्यामुळे तेथील नागरिक 100% टॅक्स भरूनही आम्हाला महापालिकेच्या कुठल्याच सोयी सुविधा नसल्याबाबत त्या भागातील माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना सदर नगरातील नागरिक यांनी समक्ष भेटून निवेदन दिले होते त्याची दखल घेऊन शासन दरबारी व सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना लेखी निवेदन देऊन पाठपुरावा केला होता.
याला यश आले असून शासनाच्या मूलभूत सोयी सुविधा योजनेअंतर्गत प्रथम पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली आणि नंतर शासनाच्या सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत ड्रेनेज लाईन करण्यात आली तसेच ड्रेनेज लाईन केल्यामुळे सगळे रस्ते उखडले गेले होते त्यामुळे जेष्ठ नागरिक महिलावर्ग शालेय विद्यार्थी यांना चालणे मुश्किल झाले होते ही बाब सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओबासे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ तेथील रस्ते करणे बाबत संबंधित अधिकारी यांना आदेश दिल्याने सदरचे रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले असून लवकरच तेथील नागरिकांची रस्त्याबाबतची गैरसोय दूर होणार असल्याने तेथील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे व त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
गेल्या 20 ते 30 वर्षापासून आम्ही सदर नगरामध्ये राहत असून आम्ही 100% सोलापूर महानगरपालिकेला नियमित टॅक्स भरत असतो परंतु आम्हाला मूलभूत सुविधा उदा. पाण्याची पाईपलाईन, अंतर्गत रस्ते, दिवाबत्ती, बाबत वारंवार महानगरपालिका निवेदन देऊनही कोणीच आम्ही दखल घेत नव्हते परंतु माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना लेखी निवेदन दिल्यानंतर तातडीने आम्हाला प्रथम पाण्याची पाईपलाईन व नंतर ड्रेनेज लाईन व आता प्रत्यक्ष रस्त्याचे काम सुरू झाले आहे त्यामुळे आम्हाला माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्यासारख्या कार्यसम्राट कर्तव्यदक्ष नगरसेविका लाभल्या हे आमचे भाग्य समजतो असे मनोगत व्यक्त केले व केले कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्या.
यावेळी सदर नगरातील जमखंडी, गुरव, जगताप, झाडबुके, कटगेरी, वेदांत बाबे, भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment