सोलापूर - रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्ष सबंध महाराष्ट्र भर कार्यरत आहे व अत्यंत प्रभावीपणे वैद्यकीय क्षेत्रातील रुणांना केलेल्या मदत कार्याची दखल घेत दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्ष सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रीती घाडगे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड पुनश्चः सार्थ ठरवित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमांतून रुग्ण सेवेस कटिबध्द असल्यांचे प्रतिपादन प्रिती घाडगे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या निर्देषानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख जितेंद्र सातव, राज्य संपर्क प्रमुख सचिन सरवदे यांनी दुसऱ्यांदा अधिकृत नियुक्ती पत्र व ओळखपत्र देऊन निवड केली.
प्रिती घाडगे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्ष निर्मित्ती पासून सोलापूर जिल्हयांच्या कार्याध्यक्ष पदावर कार्यरत आहेत रुग्णांना वैद्यकीय मदत कार्यात सक्रिय राहून काम करीत आहेत तसेच रुग्णांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यास कटिबद्ध आहेत. त्यांनी पुणे, सांगली, धाराशिव जिल्हयांसह सोलापूर जिल्हयांतील तालुका निहाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून असंख्य रुग्णांना वैद्यकीय मदत तर अपघातील गंभीर रुग्णांना शासकीय अर्थ सहाय्य मिळवून दिलेले आहे.
यावेळो पक्षातील वरीष्ठ तझांचे मार्गदर्शन व वैद्यकीय क्षेत्रांतील अधिकाऱ्यांशी समन्वयांनी कार्यरत असल्यांने रुग्णांना तत्पर सेवा मिळत आहे हे काम पुण्याईचे समाजसेवेचे असल्यांचे सौ. घाडगे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment