राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी राज्यव्यापी मेळाव्यास सोलापुरातून हजारो कार्यकर्ते जाणार - swarajyanewsmarathi

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, 7 June 2025

राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी राज्यव्यापी मेळाव्यास सोलापुरातून हजारो कार्यकर्ते जाणार

 


सोलापूर - १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन दिन असून पुणे बालेवाडी स्टेडियम येथे भव्य मेळाव्याच्या स्वरूपात वर्धापन दिन साजरा होणार आहे या मेळाव्यास राज्य भरातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ तसेच राष्ट्रवादीचे मंत्री मंडळातील मंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे  मार्गदर्शन कार्यकर्त्यांना मिळणार आहे.






या मेळाव्याची पूर्व तयारी सुरू असून राज्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मीटिंग घेऊन सर्व जिल्हाध्यक्षांना नियोजनाची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच पश्चिम महाराष्ट्र नियोजनाची पूर्वतयारी करण्याकरता सुरेश अण्णा घुले यांची  पश्चिम  महाराष्ट्र समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे .त्यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची महत्वाची बैठक घेण्यात आली .







या बैठकीत येणाऱ्या १० जून रोजी बालेवाडी येथे होणाऱ्या राष्ट्रवादी च्या भव्य मेळाव्यास सोलापूर शहरातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहण्याकरिता  सोलापूर शहरातील सर्व ज्येष्ठ नेते,प्रदेश पदाधिकारी , सर्व फ्रंटल सेल चे अध्यक्ष , कार्याध्यक्ष ,विधानसभा अध्यक्ष व शहर पदाधिकारी आणि शहर कार्यकारणी यांनी  हजारोंच्या संख्येने राज्यव्यापी मेळाव्यास कार्यकर्ते घेऊन जाण्यासाठी तयारीला लागावे  असे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी केले आहे.







यावेळी व्यासपीठावर प्रदेश जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान सरचिटणीस फारुक मटके,कुमार जंगडेकर जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले जेष्ठ नेते बाबा सालार सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम, युवक अध्यक्ष सुहास कदम युवती अध्यक्ष किरण माशाळकर अल्पसंख्यांक अध्यक्ष आमिर शेख शहर उपाध्यक्ष शकील शेख OBC सेल विभाग अध्यक्ष अनिल छत्रबंद OBC सेल कार्याध्यक्ष आयुब शेख अल्पसंख्याक जनरल सेक्रेटरी मोईज मुल्ला, दक्षिण विधानसभा अध्यक्ष अशपाक कुरेशी, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, दिव्यांग सेल विभाग अध्यक्ष एम. एम. इटकळे, उत्तर विधानसभा अध्यक्ष ॲड.अमोल कोटी वाले, प्रकाश झाडबुके, सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, सागर गव्हाणे, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेराज आबादी राजे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे, संतोष वेळापुरे, शामराव गांगर्डे, नाम पवार, बाबुराव इरवडकर, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, कामगार आघाडी अध्यक्ष मार्तंड शिंगारे , कार्याध्यक्ष संजय सांगळे, प्रज्ञासागर गायकवाड अल्पसंख्यांक मध्य विधानसभा अध्यक्ष नय्युम सालार यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here