बहिर्जी पथक हे शिवरायांचे मुख्य बलस्थान होते - सुधाकर इंगळे महाराज - swarajyanewsmarathi

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, 11 June 2025

बहिर्जी पथक हे शिवरायांचे मुख्य बलस्थान होते - सुधाकर इंगळे महाराज

 


सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराजांचे यशाचे गमक म्हणजे त्यांची बलस्थाने होत. त्या बलस्थानातील बहिर्जी पथक हे मुख्य बलस्थान होते . गनिमीकावा, गड किल्ले ही सुद्धा बलस्थाने होती. हे विचार सुधाकर इंगळे महाराज यांनी दुर्गराज रायगड येथे राज सदरेवर 352 व्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा निमित्त आयोजित कार्यक्रमातील कीर्तनामध्ये व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बौद्धिक उंचीचे व क्षमतेचे वर्णन करणे आपणास अशक्य आहे.






 " बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे | "  

हे संत ज्ञानेश्वर महाराजांनी बुद्धीचे जे वर्णन केले आहे. ते शिवाजी महाराजांच्या बुद्धीकडे पाहून केले असेल असे ही गौरवोदगार कीर्तनातून काढले. कारण प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये स्वराज्य प्रेम निर्माण करून ते स्थिर करणे खूप कठीण काम त्यांनी सहज केले होते. खूप कमी कालावधी मध्ये स्वराज्या प्रेम अनेकांच्या मनात निर्माण केले होते. स्वराज्यासाठी केवळ लढावं असं नाही तर प्रसंगी मरावं सुद्धा हे बुद्धी चतुर्य आहे.

     






या कीर्तनासाठी दुर्गराज रायगड येथे रायगड प्रतिष्ठान सोलापूर यांचे माध्यमातून शिवाजी भाऊ भोसले यांनी नियोजन केले होते. कोकणकडा मित्र मंडळ यांचेवतीने सुधाकर इंगळे महाराज यांचा सन्मान करणेत आला. जोतिराम चांगभले , गुरुसिद्ध गायकवाड यांनी मृदंग वादन व बळीराम जांभळे , कृष्णा महाराज चवरे, ज्ञानेश्वर माऊली भगरे यांनी गायन सेवा केली. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी सचिन भोसले, ऋषिकेश झांबरे, अजिंक्य मोरे, चैतन्य मोरे, शिवानंद जाधव, इ पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here