विमानसेवा शुभारंभ कार्यक्रमाच्या मंडप उभारणीची तयारी सुरू - swarajyanewsmarathi

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, 6 June 2025

विमानसेवा शुभारंभ कार्यक्रमाच्या मंडप उभारणीची तयारी सुरू

 




सोलापूर :  सोलापूरकरांचे स्वप्न असलेल्या विमानसेवेचा शुभारंभ ९ जून रोजी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर विमानतळावर होणार आहे. या कार्यक्रमाच्या मंडप उभारणीची तयारी सुरू झाली असून मंडप उभारणी व इतर व्यवस्थेची पाहणी आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे यांच्यासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शुक्रवारी सायंकाळी केली.







पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी आमदार देवेंद्र कोठे यांना सोलापूर विमानतळाच्या उद्घाटनाबाबत निरोप देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या विमानसेवा उद्घाटन कार्यक्रमाची तयारी करण्याच्या सूचना दिल्या. ९ जून रोजी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूरची विमानसेवा सुरू होणार असल्याचे आ. देवेंद्र कोठे यांनी जाहीर करताच शहरात आनंदाचे वातावरण पसरले. विमानसेवेच्या माध्यमातून सोलापूरच्या विकासाचे द्वार उघडल्याबद्दल सोलापूरकरांनी समाज माध्यमांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे यांचे जोरदार कौतुक केले. 








सायंकाळी उद्घाटन कार्यक्रम होणाऱ्या ठिकाणाची पाहणी करून संबंधितांना वरिष्ठांनी सूचना दिल्या. याप्रसंगी आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे यांच्यासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सोलापूर महानगरपालिकेच्या नगर अभियंता सारिका आकुलवार, राष्ट्रीय विमान प्राधिकरणाचे चंद्रेश वंजारा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मनोज ठाकरे, माने आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here