सोलापूर - प्रार्थना फाऊंडेशन व सेवादाई सोशल फाऊंडेशन आयोजित तिसऱ्या कृतिशील तरुणाई शिबिराचे उद्घाटन मोरवंची येथे पार पडले.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार सर व त्यांच्या पत्नी रम्या कन्नन या उपस्थित होत्या.दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.तरुणांनी भरपूर अभ्यास करावा अपयश आले म्हणून नैराश्यात न जाता प्रत्येक संकटांचा सामना करत जिद्दीने यश मिळवाव असा संदेश पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांनी उपस्थित तरुणाईला दिला.प्रार्थना फाऊंडेशन चे कार्य हे समाजाला दिशा देणारे आहे.समाजातील वंचित ,गरजू वृद्ध व मुलांना आधार देऊन त्यांना सक्षम बनवण्याचे कार्य संस्था करत आहे.संस्थेच्या माध्यमातून असेच समाज हिताचे कार्य घडत रहावे या सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या.
स्वतःला मानसिक दृष्टया सक्षम व स्थिर ठेऊन जीवनाची वाटचाल कशी करावी या बाबत रम्या कन्नन यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.
तरुणाईमध्ये सामाजिक भान निर्माण करण्यासाठी व त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा आणि त्यातून एक समाजभान जपणारी सक्षम पिढी निर्माण व्हावी यासाठी कृतिशील तरुणाई शिबिराचे आयोजन केले जाते.कृतिशील तरुणाई शिबिराचे हे तिसरे वर्ष आहे.या शिबिरासाठी महाराष्ट्र भरातून सामाजिक विचारांची, स्वतात बदल करून समाजात कृतिशील बदल घडवू पाहणाऱ्या तरुण-तरुणींचा सहभाग असतो.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रार्थना फाऊंडेशन च्या अनु मोहिते,प्रसाद मोहिते,शुभम मिसाळ,सेवादाई सोशल फाऊंडेशन चे विष्णू भोसले,साहिल तुपे आदी मान्यवर उपस्थित होते
No comments:
Post a Comment