सोलापूर - दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी सोलापूर येथील उर्दू घरात मनपा उर्दू शाळांचे अंतरशालेय क्विझ कॉम्पिटिशन मोठ्या उत्साहात पार पडले. हा उपक्रम मा. गिरीश पंडित (प्रशासन अधिकारी, मनपा प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर) यांच्या प्रेरणेने व मा. निलोफर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उर्दू घराचे सदस्य मेहमूद नवाज व सरफराज बलूलखान उपस्थित होते. फेडरेशनचे अध्यक्ष फजल शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्व उर्दू शाळांतील शिक्षकांनी परिश्रमपूर्वक योगदान दिले.
या स्पर्धेसोबतच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या 15 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये विशेष गुण मिळवणाऱ्या अनजलना समीर अहमद दामटे (218 गुण) व आयेशा अजीम शेख (216 गुण) यांचा गौरव करण्यात आला.
तसेच, ओलंपियाड परीक्षेत राज्यस्तरावर यश मिळवणाऱ्या मनपा उर्दू मुले तीनच्या दोन विद्यार्थ्यांचा – सायन माजिद चांदा (51 rank) व खानसा इस्माईल बागवान (102 rank) – सुद्धा सत्कार करण्यात आला. सर्व विजेत्यांना ट्रॉफी व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
क्विझ कॉम्पिटिशनचे निकाल पुढीलप्रमाणे : -
*मोठा गट (इयत्ता 6 वी - 7 वी):*
🥇 प्रथम क्रमांक – मनपा उर्दू मुले 3
🥈 द्वितीय क्रमांक – मनपा उर्दू मुले 5
🥉 तृतीय क्रमांक – मनपा उर्दू मुले ह नं 2
🎖️ उत्तेजनार्थ – मनपा उर्दू मुली कॅम्प
*लहान गट (इयत्ता 4 थी - 5 वी):*
🥇 प्रथम क्रमांक – मनपा उर्दू मुले हेडक्वार्टर
🥈 द्वितीय क्रमांक – मनपा उर्दू मुले ह नं 2
🥉 तृतीय क्रमांक – मनपा उर्दू मुली कॅम्प
🎖️ उत्तेजनार्थ – मनपा उर्दू मुले 1
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी आणि त्यांच्यामध्ये स्पर्धात्मकता निर्माण करण्यासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरला.
No comments:
Post a Comment