सोलापूर - महानगरपालिका मुलांची शाळा गरिबी हटाव क्र. 2, विजापूर नाका, सोलापूर येथील सहा विद्यार्थ्यांनी ५वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांमध्ये आयेशा अजीम शेख हिने 216 गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
तिच्या पाठोपाठ पुढील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे:
सुरय्या सनाउल्लाह शेख – 186 गुण
अब्दुल्ला अबूताहेर जमादार – 136 गुण
मोहम्मद याहीया इमरान जमादार – 130 गुण
आशफिया एजाज शेख – 128 गुण
मोहम्मद गौस तौफिक शेख – 124 गुण
या यशामागे मा. गिरीश पंडित (प्रशासन अधिकारी, मनपा प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर) यांचे प्रेरणादायी नेतृत्व लाभले. तसेच, रजनी राऊळ व निलोफर सय्यद (पर्यवेक्षिका) यांचे मार्गदर्शन आणि मुख्याध्यापिका सालेहा शेख, अजीम शेख, रजिया हुंडेकरी, अलीना मदत, तरन्नूम बडेपीर आणि आरती गायकवाड या शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शिष्यवृत्ती परीक्षेसोबतच शाळेतील विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा, गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा, आयडियल मोमेंट स्कॉलरशिप परीक्षा तसेच मायनॉरिटी टॅलेंट सर्च परीक्षांमध्येही सहभाग घेऊन यश मिळवले आहे. या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन शिक्षक इम्रान जमादार यांनी केले.
या यशामुळे शाळेतील पालक वर्ग अत्यंत आनंदित व समाधानी आहे. विद्यार्थ्यांचे हे यश संपूर्ण शाळेसाठी गौरवाची बाब आहे.
No comments:
Post a Comment