छत्रपती संभाजी नगर येथे टूर्नामेंट सुरू असलेल्या सोलापूर संघ प्रथम - swarajyanewsmarathi

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, 11 May 2025

छत्रपती संभाजी नगर येथे टूर्नामेंट सुरू असलेल्या सोलापूर संघ प्रथम



सोलापूर - छत्रपती संभाजी नगर येथे सुरू असलेल्या इनविटेशन टूर्नामेंट मध्ये सोलापूर संघाने छत्रपती संभाजीनगर संघाचा *पहिल्या डावातील अवघ्या १ रन च्या आघाडीवर पराभव करून तीन गुण मिळवून ग्रुप मध्ये एकूण १८ गुण घेऊन प्रथम क्रमांक टिकवला आहे.






धावफलक - सोलापूर संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्व बाद २०० धावा केल्या. कर्णधार वीरांश वर्मा याचे शतक अवघ्या पाच धावाने हुकले. तो 95 धावावर बाद झाला. त्याला सार्थक कन्ना 41 धावा व मयंक पात्रे याने 34 धावा करून साथ दिली. छत्रपती संभाजी नगर संघा ने पहिल्या डावात सर्व बाद 199 धावा केल्या. या ठिकाणी सोलापूर संघास एक धावाची महत्त्वाची आघाडी मिळाली व त्यामुळेच सोलापूर संघाने आज संभाजीनगर संघाचा  पराभव करून तीन गुण प्राप्त केले.





धावफलक - मोहम्मद अली नाबाद 95 धावा कुरेशी 29 धावा, योगेश 26 धावा व श्लोक महेंद्र याने 21 धावा केल्या. सोलापूर संघाकडून सोहम कुलकर्णी याने 56 धावा मध्ये सात बळी घेऊन संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला त्याला इ दांत जैन याने 72 धावात दोन बळी व अभिजीत सरवदे याने 14 धावा एक बळी घेऊन साथ दिली. सोलापूर संघाने दुसऱ्या डावात सर्व बाद २४७ धावा केल्या. 






धावफलक - पहिल्या डावात अवघ्या पाच धावाने शतक हुकलेल्या कर्णधार विरांश वर्मा यांने दुसऱ्या डावात तडफदार  शतक करून 103 धावा केल्या. त्याला अभिजीत सरवदे 38 धावा व सार्थक कन्ना याने 20 धावा करून साथ दिली. 





संभाजीनगर कडून मयंक कदम याने 55 धावात चार बळी घेतले तसेच मोहम्मद अली याने 62 डावात चार बळी घेतले व अभिराम गोसावी याने  58 धावा देऊन दोन बळी घेतले. छत्रपती संभाजी नगर संघाचा दुसऱ्या गावात बिनबाद एक रन असताना पाऊस सुरू झाल्याने खेळ थांबवावा लागला. 




अशा रीतीने सोलापूर संघाला पहिल्या डावात मिळालेल्या एक रन च्या आघाडीने तीन गुण प्राप्त झाले. सध्या गटामध्ये सोलापूर संघ एकूण 18 गुण घेऊन प्रथम क्रमांकावर आहे. दिनांक 13 व 14 मे 2025 रोजी सोलापूर संघाचा साखळीतील शेवटचा सामना पुणे येथील एमसीव्हीएस संघाबरोबर होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here